'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या जनरल मॅनेजरचे निधन

पुणे : 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक) अतुल जोशी यांचे निधन झाले. अतुल जोशी यांनी ४० वर्ष 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळल्या होत्या. बँकेच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या व्यवस्थापनाने एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार जनरल मॅनेजर अतुल जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांनीही अतुल जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच दुःख व्यक्त केले.

'बँक ऑफ महाराष्ट्र'ला १४०६ कोटींचा तिमाही नफा

'बँक ऑफ महाराष्ट्र'ला ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत १४०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेने या तिमाहीत ७११२ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले. 'बँक ऑफ महाराष्ट्र'ने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ६३२५ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले. बँकेच्या एकूण बुडीत कर्जांमध्ये (ग्रॉस एनपीए) घट होऊन ते १.८० टक्क्यांवर घसरले आहे. तसेच निव्वळ बुडीत कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ०.२ टक्क्यांवर घसरले आहे.

 
Comments
Add Comment

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी