पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे जनरल मॅनेजर (महाव्यवस्थापक) अतुल जोशी यांचे निधन झाले. अतुल जोशी यांनी ४० वर्ष ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळल्या होत्या. बँकेच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापनाने एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार जनरल मॅनेजर अतुल जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. एनएसई आणि बीएसईच्या अधिकाऱ्यांनीही अतुल जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच दुःख व्यक्त केले.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला १४०६ कोटींचा तिमाही नफा
‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत १४०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेने या तिमाहीत ७११२ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ६३२५ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले. बँकेच्या एकूण बुडीत कर्जांमध्ये (ग्रॉस एनपीए) घट होऊन ते १.८० टक्क्यांवर घसरले आहे. तसेच निव्वळ बुडीत कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ०.२ टक्क्यांवर घसरले आहे.