गणपतराव कदम मार्ग अतिक्रमण मुक्त

Share

मुंबई : लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील अनधिकृत शेडस्, दुकानांसमोरील वाढीव बांधकाम आदींवर मुंबई महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी कारवाई करण्‍यात आली. त्‍यामुळे पदपथ, रस्‍ता मोकळा झाला असून एक प्रकारे लोअर परळ वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग हद्दीतील गणपतराव कदम मार्गावर व्‍यावसायिक दुकानदार, गाळेधारकांनी वाढीव बांधकाम, अनधिकृत शेडस् उभारल्याचे निदर्शनास आले होते. त्‍यामुळे पादचारी, वाहनचालक यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि जी दक्षिण विभागाच्‍या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी दिले होते. त्यानुसार जी दक्षिण विभागाच्‍या अतिक्रमण निर्मूलन, देखभाल आणि आरोग्‍य विभागाच्‍या संयुक्‍त विद्यमाने कारवाई करण्‍यात आली आहे. महानगरपालिकेचे अभियंते, १२ कामगार, दोन मालट्रक आणि पोलीस दलाच्या मदतीने ही कारवाई पार पडली.

Recent Posts

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

11 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

26 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

35 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

56 minutes ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago

बर्फाचा चुरा दुधी का दिसतो?

प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…

1 hour ago