Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीCM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार दावोस दौरा! नेमकं कारण...

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार दावोस दौरा! नेमकं कारण काय?

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.

Rinku Singh : स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग अडकणार लग्नाच्या बेड्यात!

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ३ वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी औद्योगिक विकासात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात २०१४-१९ काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौऱ्यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.

डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल आणि यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. महाराष्ट्राने विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली आहेत, त्याबाबत सुद्धा ते विविध व्यावसायिक बैठकांमध्ये अवगत करतील. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यातून प्रयत्न करणार आहेत.

सर्व विभागात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न

दरम्यान, राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -