मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy 2025) हळू हळू जवळ येत आहे. स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. मात्र अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. आता बीसीसीआय घोषणा करण्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे. उद्या म्हणजेच शनिवारी चॅम्पियन्स ट्ऱॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिका खेळणार आहे. यात पाच टी-२० आणि ३ वनडे सामने खेळवले जाणार आहेत. टी-२० मालिकेची सुरूवात २२ जानेवारीला होईल. यासाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. मात्र वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा होणे बाकी आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा एकत्र केली जाईल.
सिलेक्शन मीटिंगनंतर पत्रकार परिषद होईल. ही पत्रकार परिषद दुपारी साडे बारा वाजता होईल. या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य सिलेक्टर अजित आगरकर भाग घेतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात १९ फेब्रुवारीला होत आहे. तर स्पर्धेचा शेवटचा सामना ९ मार्चला होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जाणार आहे. दरम्यान, टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. स्पर्धेतसाठी ८ संघांना २ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. यात ग्रुप ए आणि ग्रुप बी सामील आहे. टीम इंडियाला ग्रुप एमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडसोबत ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळेल.
टीम इंडियाने २०१३मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब जिंकला होता. यानंतर २०१७मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…