नवी दिल्ली : दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-२०२५ (ऑटो एक्स्पो) च्या दुसऱ्या आवृत्तीचे उदघाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. यासोबतच ऑटो कंपन्यांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. आता या ६ दिवसांच्या कार्यक्रमात भारत आणि परदेशातील ऑटो कंपन्या सहभागी होत आहेत.
BCCIच्या खेळाडूंसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, पालन केले नाही तर…
हा ऑटो एक्स्पो १७ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान चालणार आहे. ऑटो एक्स्पोचे दरवाजे १९ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले राहतील. हा कार्यक्रम केवळ ऑटो क्षेत्रासाठी नाही तर हे ऑटो कंपोनेंट, बांधकाम उपकरणे, सायकली आणि भविष्यातील गतिशीलता तंत्रज्ञानाचे कौशल्य देखील प्रदर्शित करेल. भारतात एकाच वेळी एकूण ९ प्रदर्शने आयोजित केली जात आहेत. यावेळी हा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो विशेष ठरत आहे कारण यामध्ये १०० हून अधिक नवीन गाड्या लॉन्च केल्या जाणार आहेत.
Futuristic. Bold. Electric.
Witness the BE 6 and XEV 9e up-close at the Bharat Mobility Global Expo 2025 from January 17th to 22nd. Hall no.14, Stall no. 1.#UnlimitIndia #UnlimitLove #MahindraBE6 #MahindraXEV9e #MahindraElectricOriginSUVs #MahindraAuto #AutoExpo2025 pic.twitter.com/0GYJBx1xRQ
— Mahindra Electric Origin SUVs (@mahindraesuvs) January 15, 2025
या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या गाड्या दिसतील. यामध्ये, ऑटो एक्स्पोचा नकाशा पाहून तुम्ही तुमच्या आवडत्या कारचा स्टॉल कोणत्या ठिकाणी आहे ते तपासू शकता. तसेच भारत मोबिलिटी २०२५ हे प्रगती मैदान, द्वारका येथील यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा येथील एक्स्पो सेंटर या तीन ठिकाणी आयोजित केले जात आहे. या कार्यक्रमाला कोणीही उपस्थित राहू शकते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट खरेदी करावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यावेळी ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुजुकी इंडिया आपली पहिली इलेक्ट्रिक कार Maruti eVitara सादर करणार आहे. त्याचबरोबर हुंडई मोटर इंडिया आपली क्रेटा इलेक्ट्रिक, तर टाटा मोटर्स आपली सिएरा ईव्ही, सफारी ईव्ही आणि हॅरियर ईव्ही देखील सादर करणार आहे. याशिवाय सुजुकी मोटरसायकल, हिरो मोटोकॉर्प, एमजी मोटर, मर्सिडीज बेंझ आणि ओलेक्ट्रा ग्रीन टेक या कंपन्याही आपापल्या नवीन गाड्या लॉन्च करतील.