Monday, February 10, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती‘स्वामी ब्रह्म अन्नपूर्णा परब्रह्म’

‘स्वामी ब्रह्म अन्नपूर्णा परब्रह्म’

समर्थ कृपा – विलास खानोलकर

श्रीपादभटाचा स्वामीचरणी पूर्ण विश्वास असल्याकारणाने पाच-सहा भक्त कंदील घेऊन पलीकडच्या मळ्यात गेले. तेथे एक तेजस्वी स्त्री एका वटवृक्षाखाली उभी होती. तिच्याजवळ जाऊन तिला नमस्कार करून श्रीपादभटाने तिला विचारले, ‘येथून गाव किती लांब आहे? आणि काही अन्नाची सोय होईल काय?’ त्यावर ती बाई सांगू लागली, ‘आज आमच्या गावातील काही मंडळी येथे भोजनास यायची आहेत. त्यांच्याकरिता स्वयंपाक करून ठेवला आहे. अद्याप कोणीही आले नाही. या अन्नाचे काय करावे म्हणून मी मोठ्या काळजीत आहे. तुम्ही आलात फार चांगली गोष्ट झाली. आता कृपा करून हे तयार अन्न घेऊन जा. येथे पाणीही आहे.

“आत्म्यातील कर्ण”

तेव्हा श्रीपादभट आणि त्यांच्याबरोबरचे भक्त सर्व अन्न व फळफळावळ घेऊन निघाले. तेवढ्यात श्रीपादभटाने त्या तेजस्वी स्त्रीस विचारले, ‘तुम्ही येथे जंगलात एकट्या कशा राहाल?’ आमच्याबरोबर स्वामी समर्थ दर्शनाला चला. ‘स्वामी समर्थ महाराजांना माझा शिरसाष्टांग नमस्कार सांगा. माझेच नाव अन्नपूर्णा, मी मागावून दर्शनाला येते, तुम्ही पुढे चला. श्रीपादभट व बरोबरचे मंडळी ते अन्न व शिधा घेऊन निघाली. लागोलग श्रीपादभटाने मागे वळून पाहिले तर ती तेज स्त्री आकाशात अंतर्धान पावली होती. या चमत्काराचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. जेथे स्वामी महाराज होते तेथे ती मंडळी अन्न व जेवण घेऊन आली. नंतर श्री स्वामी समर्थांना केळीच्या पानावर नैवेद्य दाखविला. स्वामी समर्थांसह भक्तगणही जेवले. अन्नदाता सुखीभव असा आशीर्वादही भक्तांनी स्त्रीला दिला आणि स्वामींचे भक्त बाबा जाधवांनी समर्थांना विचारले, महाराज ती स्त्री कोण व कुठून आली? त्यावर स्वामी महाराज म्हणाले, ती आमच्याच कुटुंबातील साक्षात अन्नपूर्णादेवी. तेव्हा सर्वांची खात्री झाली की, महाराज नेहमी म्हणत असत, अन्नपूर्णादेवीकडे भोजनाला चला. अन्नपूर्णादेवी हीच ती वटवृक्षाखाली अदृश्य झालेली साक्षात \ अन्नपूर्णादेवी होती. म्हणूनच घरातील प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी मानले जाते.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।१​​।।
!! बोला स्वामी समर्थ महाराज की जय!!

अन्नपूर्णा देवी

देवी आल्या नवरात्री
मुंबईची महालक्ष्मी पंचरात्री ।। १।।
स्वामी उभे ओवाळण्या रात्री
अन्नपूर्णा देवी स्वामीरूपे रात्री ।। २।।
स्वामी भक्तांसाठी उभे दिवसरात्री
संकटे ‘पळून’ जाती ऐके रात्री ।। ३।।
नका घाबरू भक्त जनहो
स्वामी उभे तुमच्यासाठी हो ।। ४।।
सारे जग स्वामी वेगळे
स्वामी फक्त जगावेगळे ।। ५।।
गोरगरिबांसाठी स्वामी धावती
स्वामी भक्तही धावती करूनी भक्ती ।। ६।।
अक्कलकोट नामे स्वर्गनगरी
भक्तभरती सोन्याच्या घागरी ।। ७।।
विठ्ठलाचे जसे उभे पंढरपूर
तदैवच अक्कलकोटी भक्तीचा पूर ।। ८।।
भजन सम्रटांचाही लागे सूर
भक्तीचे सूर जाती देशी दूर दूर ।। ९।।
उभे गजानन महाराज, राऊळ महाराज तेथे
साई बाबा, निवृत्तीनाथ महाराज
उभे तेथे।। १०।।
स्वामी म्हणे घ्या स्वामी नाम
स्वामी समर्थ करेल तुमचेच समर्थनाम।। ११।।
जशी वाहे प्रेमे स्वामीनामाची गंगा
तशी वाहे काशीप्रयाग पुण्यगंगा।। १२।।
नाही आदी नाही अंत
सारे चाले जोरात सुखांत ।। १३।।
सारा तो पुण्य प्रभावाचा प्रंत
नका करू संकटांची भ्रंत ।। १४।।
मनशांतीने काम करा शांत
सार्या सुखाने आनंदि प्रशांत ।। १५।।
प्रसन्न होईल लक्ष्मी विष्णुकांत
कमळात उभी ती महालक्ष्मी शांत ।।१६।।
मनाची तिजोरी गजांत लक्ष्मी प्रंत
मेंदूची कमजोरी पळून व्हाल शांत ।। १७।।
दिवसरात्र काम करा प्रगाढ
शरीरव्यायामाने झोप लागेल गाढ।। १८।।
स्वभाव ठेवा हसत, आनंदि प्रगाढ
दुखणार नाही कधी अक्कलदाढ ।। १९।।
अक्कलकोटचा घ्या अक्कल काढा
अक्कलकोटीच बांधा तुमचा वाडा।। २०।।
पुत्रपौत्र जनता होतील सदा सुखी
स्वामी कृपे विलास अमर बोलती मुखी ।। २१।।
अन्नधान्य पडणार नाही कधी कमी
आशिर्वाद देण्यास साक्षात उभे स्वामी ।।२२।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -