Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीभारताशी पंगा घेणारे जस्टिन ट्रुडो राजकीय संन्यास घेणार ?

भारताशी पंगा घेणारे जस्टिन ट्रुडो राजकीय संन्यास घेणार ?

कॅनडा : खलिस्तान समर्थक आणि अतिरेकी हरदीप सिंह निज्जर हत्येप्रकरणी भारतासोबतचे कॅनडाचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडण्यास कारणीभूत ठरलेले जस्टिन ट्रुडो राजकारणातून कायमचे बाहेर फेकले जाण्याची शक्यता वाढली आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) लवकरच राजकीय संन्यास घेणार असल्याचे वृत्त आहे. सत्ताधारी पक्षात ट्रुडो यांच्याविषयीची नाराजी वाढली आहे. यामुळे ट्रुडोंवर राजकीय संन्यास घेण्यासाठीचा दबाव वाढला आहे. याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

Canada : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला तरी जस्टिन ट्रुडो आणखी काही महिने कॅनडाच्या संसदेचे सदस्य असतील. कॅनडात २०२५ मध्येच निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जाहीर होण्याआधीच ट्रुडो यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याची भाषा सुरू केली आहे. निवडणूक लढवण्याऐवजी राजकीय संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचे जस्टिन ट्रुडो यांनी एका मुलाखतीत सांगितले.

Oscars ceremonyला आगीचा फटका! अमेरिकेतील ऑस्कर २०२५ सोहळा रद्द होणार?

कॅनडातील ‘ग्लोबल न्यूज’ने जस्टिन ट्रुडो राजकीय संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त दिले आहे. अद्याप निर्णय झालेला नाही पण राजकीय संन्यास घेण्याबाबत विचार सुरू आहे, असे जस्टिन ट्रुडो म्हणाले. पुढे काय करायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. कॅनडातील राजकारणी, सरकारी अधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांनी राजकीय संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -