Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Emergency : इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या व्हिलन, मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

Emergency : इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या व्हिलन, मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या व्हिलन होत्या, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


फडणवीसांनी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'(Emergency) चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी इमर्जन्सी चित्रपट आणि या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आणीबाणी आपल्या सर्वांसाठी असा काळ होता, जेव्हा देशातील सगळ्या नागरिकांचे मानवाधिकार समाप्त करण्यात आले होते. हा काळ माझ्यासाठी वैयक्तिकरित्या महत्वाचा आहे. कारण आणीबाणीच्या काळात माझे वडील जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. तेव्हा मी केवळ पाच वर्षांचा होतो. त्यावेळी मला वडिलांना भेटायचं असेल तर न्यायालय किंवा तुरुंगात जावं लागायचं. आजही त्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत."


 


पुढे ते म्हणाले, "आता तो आणीबाणीचा काळ पुन्हा एकदा कंगनाने चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर आणला आहे. कंगना स्वत: या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देते. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. इंदिरा गांधी देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या. पण त्या काळात त्या आमच्यासाठी खूप मोठ्या व्हिलन होत्या. पण ठीक आहे. प्रत्येक कालखंडाची एक वेगळी कहाणी असते. इंदिरा गांधी यांनीही आपल्या देशासाठी चांगलं काम केलं आहे", असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment