प्रजासत्ताक दिनी मिळणार लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना २६ जानेवारी रोजी या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे.


या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत.



आदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही फेब्रुवारीचे नियोजनसुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही २ कोटी ४६ लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. थोड्याफार कमी होतील.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने