Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा

बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा
नवी दिल्ली : बनावट कागदपत्रे सादर करुन प्रशिक्षणार्थी आयएएस या टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. लोकसेवा आयोगाने बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक झाल्याचे आढळल्यानंतर पूजा खेडकरला निलंबित केले. पूजाला आयएएस तसेच सर्व प्रकारच्या प्रशासकीय सेवांच्या परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक केल्याप्रकरणी पूजा विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली. या प्रकरणात पूजाला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल.



पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर अटकेचे संकट टाळण्यासाठी पूजाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देत पूजा खेडकर प्रकरणी पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment