चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात १५ दिवसांत सहा वाघांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण चंद्रपूरमध्येच उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होऊ लागले आहेत. ताजी घटना पेंच येथील आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. या बछड्याला पुरेसं अन्न न मिळाल्याने त्याची उपासमार होऊन मृत्यू झाला.
Emergency Banned In Bangladesh : ‘या’ देशात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला नो एन्ट्री !
उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. जंगलतोड करुन शहरीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिकार करण्यासाठी वन्यजीव उपलब्ध होत नसल्यामुळे वाघ जंगलातून बाहेर पडत आहेत. जंगलाबाहेरच्या वातावरणात टिकाव धरणे कठीण झाल्यामुळे पेंचमध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला. ताज्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी यांनी दुःख व्यक्त केले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने आवश्यक ते उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वाघांचे मृत्यू होण्याची कारणे पुढीलप्रमाणे :
१. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत.
२. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा उपासमार होऊन मृत्यू झाला.
३. भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली.
४. एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला
५. चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला.
६. गोंदिया जिल्ह्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला.