मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हा सिनेमा पुढील काही दिवसात रिलीज होणार असून अनेकांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकसता आहे. तसेच या चित्रपटात कंगना रणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली असून तिनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कंगनाचा हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. परंतु काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला. त्यातच आता असे समजते की ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार नाही.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला दिला नवा दृष्टीकोन’
‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
बांगलादेशमध्ये ‘इमर्जन्सी’चे प्रदर्शन होणार नाही. हा निर्णय भारत आणि बांगलादेशमधील सध्याच्या ताणलेल्या संबंधांशी जुडलेला आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात भारताने १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः, शेख मुजीबुर रहमान (बांगलादेशाचे जनक) यांना भारताने दिलेल्या पाठिंब्याची कथा आणि बांगलादेशातील अतिरेकींनी त्यांची हत्या केल्याची घटनाही दाखवण्यात आली आहे, जी बंदीच्या निर्णयामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
यापूर्वी ‘या’ चित्रपटांवरही बंदी
‘इमर्जन्सी’ हा बांगलादेशात बंदी घातलेला पहिला भारतीय चित्रपट नाही. यापूर्वी ‘पुष्पा २’ आणि ‘भूल भुलैया ३’ सारख्या चित्रपटांनाही बांगलादेशात प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.