Nylon Manja : नायलॉन मांजामुळे तीन जण जखमी!

नाशिक : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2025) दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र पतंग उडवताना अनेकवेळी नायलॉन मांजा किंवा चिनी मांज्याचा वापर केला जातो. परंतु अशा मांजामुळे माणसांसह अनेक पक्षांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी (Nylon Manja Ban) घातली असून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या घोषणा केल्या होत्या. मात्र तरीही अनेक ठिकाणी नायलॉन मांजा वापरात असल्याचे दिसून आले. सातत्याने नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या तक्रारी वाढत असताना नाशिकमध्येही (Nashik News) अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.



नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजामुळे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मांजा गळ्यात अडकल्यामुळे दोन शाळकरी मुलं तर नाशिकच्या मनमाडमध्ये गॅस सिलंडरचा वाटप करणाऱ्या तरुणाच्या गळ्यात मांजा अडकल्यामुळे जखमी झाले आहेत. मयूर निकम आणि ओम ठाकरे ही शाळकरी मुले घरी जात असताना तर काकासाहेब भालेराव सिलेंडर वाटप करताना ही घटना घडली. सध्या या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र वारंवार प्रशासनाच्या सुचना आणि कारवाई करुनही नायलॉन मांजाचा वापर सुरुच असल्याचे दिसत आहे.



नायलॉन मांजा वापरणाऱ्याविरुद्ध पोलीस अ‍ॅक्शन मोडवर


दरम्यान, नायलॉन मांजा वापरणाऱ्याविरुद्ध नाशिकच्या येवला परिसरात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून ३५ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र