
मुंबई : नवे वर्ष सुरु होताच अनेक गोष्टींच्या नियमावलीत बदल केले जातात. अशातच अमेरिकन कॉफी ब्रँड स्टारबक्सने (Starbucks Rule) देखील नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून काही ग्राहकांना महागात पडणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं कारण काय? मुंबई : एआय (AI) आता प्रत्येक प्रगत क्षेत्रात पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील नागरिकांना एआयचा चांगलाच फायदा होत आहे. परंतु ...
स्टारबक्सने जारी केलेल्या नियमानुसार, ग्राहकांना एमरजन्सीसाठी वॉशरुम किंवा फ्री वाय-फाय वापरायचे असल्यास कॅफेमधून काहीतरी खरेदी करावे लागणार आहे. हा नवा नियम २७ जानेवारीपासून लागू होणार आहे.
त्याचबरोबर कॅफेमध्ये बसून दारू पिणे, धूम्रपान करणे, ड्रग्जचे सेवन करणे यासारख्या गोष्टींवर आता बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. कोणीही असे करताना आढळल्यास, त्याला त्वरित कॅफे सोडण्यास सांगितले जाईल. गरज पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाईल. कॅफेमधील कर्मचाऱ्यांना आता या नव्या नियमाची माहिती दिली जाणार असून त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
याबाबत स्टारबक्सचे प्रवक्ते जेसी अँडरसन यांनी याबाबत सांगितले की, अनेक रिटेल स्टोअरमध्ये हा नियम आधीपासूनच लागू आहे. त्याचप्रमाणे स्टारबक्स कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आरामदायी वाटण्यासाठी तसेच योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. (Starbucks Rule)