Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीSantosh Deshmukh Murder Update : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात नवीन एसआयटी टीम...

Santosh Deshmukh Murder Update : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात नवीन एसआयटी टीम दाखल

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासासाठी १ जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच या नव्या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. आधीच्या एसआयटीसोबत आरोपी संपर्कात असल्याच देशमुखांच्या कुटुंबीयांनी सांगितलं होत. त्याचमुळे नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एकाचीही सुटका न करता योग्य ती शिक्षा द्या असे बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या . मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, असे आदेश दिले आहेत.

Ratnagiri News : विद्येच्या मंदिरात शिक्षकानेच केले विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

नवीन एसआयटी टीम पुढीलप्रमाणे आहे :

– किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
– अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
– सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
– अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
– शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
– दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

दरम्यान आता नवीन एसआयटी टीम आल्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात कोणते नवीन अपडेट समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -