Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीBinil TB an Indian killed in Ukraine : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय युवकाचा...

Binil TB an Indian killed in Ukraine : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय युवकाचा मृत्यू, एक जखमी

मॉस्को : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे.या युद्धात एका भारतीय युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा नातेवाईकही गंभीर जखमी झाला आहे. बिनील टीबी (वय ३२) असे मृताचे नाव आहे. बिनील टीबी केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होते. जैन टीके (२७) असे जखमीचे नाव असून तोही त्याच भागातील रहिवासी आहे.

Walmik Karad Update : लेकाला न्याय मिळावा यासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्री मैदानात उतरल्या

काही दिवसांपूर्वी बिनीलच्या कुटुंबीयांना ड्रोन हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली होती, मात्र कुटुंबीय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. बिनील आणि जैन यांचे नातेवाईक सनिश यांनी माध्यमांना सांगितले की, “बिनीलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे आणि त्यांना ही माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की बिनिल मरण पावला असून रशियन सैन्याने त्यांना ही माहिती दिली आहे.बिनिल व जैन गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घरी परतण्यासाठी प्रयत्न करत होते. गेल्या महिन्यात बिनिलने दी इंडियन एक्सप्रेसला काही व्हॉईस मेसेजेस पाठवले होते. त्यामध्ये बिनिलने सांगितले होते की, मायदेशी परतण्यासाठी सप्टेंबरपासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासाकडे दाद मागितली होती, पण यश मिळाले नाही.

केरळमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणाऱ्या बिनीलने सांगितले होते, “आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो आहोत. आम्ही युक्रेनच्या रशियन-व्याप्त भागात आहोत. आमचे कमांडर सांगतात की हा करार एका वर्षासाठी होता. आमच्या सुटकेसाठी आम्ही स्थानिक कमांडर्सकडे विनवणी करत आहोत. भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत रशियन सैन्य आम्हाला सोडत नाही तोपर्यंत ते आम्हाला मदत करू शकत नाहीत. दूतावास म्हणतो की आम्हाला रशियन प्रदेशात परत आणले पाहिजे.” त्यानंतर आता थेट बिनिलच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -