मुंबई : टोरेस घोटाळा प्रकरणाची तपासाची सूत्र आता ईडीच्या हाती सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या घोटाळ्यात २ हजारांहून अधिक नागरिक फसले आहेत. तर नागरिकांच्या चौकशीतून ३७ कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे.
या प्रकरणाचा पर्दाफाश करणारा व्हिसलब्लोअर्स याने युक्रेनच्या आरोपींनी २०० कोटीहून अधिकची रक्कम परदेशात वळवली आहे असा दावा केलाय. त्यामुळे आता ईडी या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करून संशयाचा एक एक धागा विस्कटून आरोपींचा छडा लावणार आहे.
Santosh Deshmukh Murder Update : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात नवीन एसआयटी टीम दाखल
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणात सहभागी असलेले १० विदेशी नागरिक फरार आहेत. त्यांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. काही जण घोटाळा उघड होण्यापूर्वीच देश सोडून पळून गेले आहेत.
आरोपी पळून जाण्यापूर्वी त्यांनी मोठ्या कल्पकतेने योजना बनवली होती. त्यांच्या नियोजनानुसार ख्रिसमसदरम्यान देश सोडून पळून जायचं होतं. पळून गेलेल्या लोकांचा व्हिसा एका महिन्यापर्यंत संपणार आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत घोटाळा करुन ख्रिसमसच्या काळात देश सोडून पळून जावा, ख्रिसमसच्या कारणावरुन देश सोडून बाहेर गेल्यास कुणाला संशय येणार नाही असं समजून त्यांनी त्यानुसार नियोजन आखलं.
दरम्यान आता ईडी तरी टोरेस गैरव्यवहार प्रकरणी फसवणूक झालेल्या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देईल का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.