Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Kolahal : थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात रसिकांना घेता येणार ‘कोलाहल’ लघुपटाचा आस्वाद!

Kolahal : थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात रसिकांना घेता येणार ‘कोलाहल’ लघुपटाचा आस्वाद!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला (Third Eye Asian Film Festival) सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई आणि ठाणे येथे १० ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत आशियाई देशांतील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना घेता येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेला आणि कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेला ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाने २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे. तर आता या महोत्सवात अभिनेत्री स्मिता तांबे आणि शुभांगी भुजबळ यांची भूमिका असलेल्या ‘कोलाहल’ (Kolahal) या लघुपटाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.



उद्या म्हणजेच बुधवार १५ जानेवारी रोजी अंधेरीच्या मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी हा लघुपट रसिकांना पाहता येणार आहे. सोनाली लोहार लिखित आणि संतोष पाठारे दिग्दर्शित ‘कोलाहल’ या लघुपटाची कथा ऐकू न येणाऱ्या एका स्त्री भोवती फिरते. थर्ड आय आशियाई चित्रपट या नावाजलेल्या महोत्सवात ‘कोलाहल’चे विशेष स्किनिंग होत असल्याचा आनंद अभिनेत्री स्मिता तांबे हिने व्यक्त केला. आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसांठी स्मिता तांबे ओळखली जाते. ‘कोलाहल’ लघुपटातील भूमिका आणि हा लघुपट प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास दिग्दर्शक संतोष पाठारे यांनी व्यक्त केला. या लघुपटाची निर्मिती रुपाली भारद्वाज आणि आरती पाठारे यांनी केली आहे.


या महोत्सवात नव्या दमाच्या दिग्दर्शकांचं विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चा सत्रात देश-विदेशातील दिग्दर्शक चित्रपटातील आपले अनुभव व चित्रपट विषयाशी निगडीत चर्चा करणार आहेत. चर्चेत चंदन आनंद, सनी हिंदुजा या दोन होतकरू दिग्दर्शकांसोबत हिरेन बोरा, जदुमणी दत्ता, समिक रॉय चौधरी हे देखील सहभागी होणार आहेत.

Comments
Add Comment