मुंबई: १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवस ग्रहांचा राज सूर्य मकर राशीत प्रवेश कऱणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जाणकारांच्या मते मकरसंक्रांतीचा दिवस एक विशेष कार्य केल्याने व्यक्तीची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच संकटांपासून मुक्ती मिळते.
वास्तुनुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी घरात पितळेचा सूर्य आणला पाहिजे. या सूर्यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा. कारण या दिशेला पितळेचा सूर्य लावल्याने कधीही धनाची कमतरता जाणवत नाही.
पितळेने बनवलेल्या सूर्याच्या खाली एक घंटी असते. असं म्हणता की या घंटीच्या आवाजाने घरात आनंदीआनंद येतो. जर तुमच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला असेल तर मुख्य दरवाजावर लावणे शुभ मानले जाते.
मकरसंक्रांतीला सूर्य देव शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करतात आणि यासाठी असे कार्य केले जातात ज्यामुळे शनी देव प्रसन्न होतात. या दिवशी काळे तीळ, गूळ आणि खिचडी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभ कार्य संपन्न होते.