पुणे : विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात चोरी आणि हत्येच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. चोरीच्या, गोळीबाराच्या, दहशतीच्या, अशा अनेक घटना दररोज समोर येत आहे. अशातच मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी दोन लाख रूपयांच्या मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याचा शोध घेतला जातोय.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरल्याचा प्रकार उघड झालाय. मेट्रो रेल्वेचे खांब चोरणाऱ्या सहा चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खांब विकून पैसे कमवण्यासाठी हे खांब चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दोन लाखांचे असणारे हे खांब चोरी झाल्याचे समजताच मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान यामध्ये अजून कोणाचा हात आहे याचा पोलीस शोध घेत आहे.