Thursday, May 15, 2025

महामुंबईसिंधुदुर्ग

मालवणी लेखकांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन

मालवणी लेखकांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन
मुंबई : मालवणी लेखकांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. हा प्रकाशन सोहळा कांदिवली येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स क्लब येथे झाला. या सोहळ्याला प्रसिद्ध लेखक प्रभाकर भोगले आणि मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक तसेच अज्ञात मुंबई या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सिंधुदुर्ग प्रतिष्ठानच्यावतीने मालवणी बोली संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उपक्रमांतर्गत पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत झाला.



प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेल्या 'गजालीतली माणसं' आणि पूर्णिमा गावडे – मोरजकर यांनी लिहिलेल्या 'गजाल गाथण' या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याला रसिक वाचक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पोर्णिमा मोरजकर यांचे पती कल्पेश मोरजकर, भाऊ दिपक गावडे, आनंद गावडे, तसेच अनुकल्प मोरजकर, कृतिका मोरजकर, अथर्व गावडे उपस्थित होते.



मालवणी लेखिका पूर्णिमा गावडे मोरजकर या रोणापाल (ता. सावंतवाडी) गावच्या सुकन्या असून मडुरा हायस्कूलच्या माजी विद्यार्थी आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विषयांवर मालवणी भाषेत लेखन केले आहे. या कामात त्यांना वडिलांचे अर्थात माजी सरपंच प्रकाश गावडे यांचे कायम प्रोत्साहन मिळाल्याचे पूर्णिमा गावडे यांनी सांगितले.
Comments
Add Comment