Mahakumbh : १४४ वर्षांनी मिळालेय भाग्य! कोण घेणार लाभ?

प्रयागराज : महाकुंभ (Mahakumbh) हा हिंदू धर्माचा महत्वाचा धार्मिक उत्सव आहे. भारतात महाकुंभचे आयोजन दर १२ वर्षांनी केले जाते. यात भाविक श्रद्धेने पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात. त्यामुळे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. महाकुंभाचे आयोजन प्रयागराजच्या संगमावर, हरिद्वार येथे गंगेत, उज्जैनमध्ये शिप्रा नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीवर केले जाते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून हा उत्सव १३ जानेवारी २०२५ पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी समाप्त होईल. यावर्षीचा कुंभमेळा खास आहे, कारण तो १४४ वर्षांनी येणाऱ्या एका शुभ योगात साजरा होतोय!


पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनातून अमृतकुंभ (Mahakumbh) म्हणजे अमृताने भरलेलं भांडं बाहेर आलं. हे अमृत देव आणि असुरांमध्ये वाटण्यासाठी देवतांनी कुंभ हाती घेतलं. त्यावेळी, भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृत वाचवलं आणि ते वाहून नेताना चार ठिकाणी काही थेंब जमिनीवर पडले. याच चार पवित्र ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहस्थितीनुसार आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशोबानं या मेळ्याची वेळ ठरवली जाते. शतकानुशतके प्रयागराज इथं माघ मेळ्याचा उत्सव साजरा केला जातो. अनेक पुराणांमध्ये या वार्षिक मेळ्याचा उल्लेख आहे. कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर होणारा हा मेळा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. कुंभमेळाच्या या ४४ दिवसांत, कोट्यवधी भाविक पवित्र स्नानासाठी प्रयागराज इथं येतील. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महाकुंभ २०२५’ होणारेय. या महाकुंभातील पहिलं शाही स्नान १४ जानेवारीला ‘मकरसंक्राती’च्या दिवशी होणारेय. यासाठी साडेदहा किलोमीटरचा घाट तयार केलाय. त्यानंतर २९ जानेवारी: मौनी अमावस्या, ३ फेब्रुवारी: वसंत पंचमी, १२ फेब्रुवारी: माघ पौर्णिमा आणि २६ फेब्रुवारी: महाशिवरात्र रोजी शाही स्नानाने सांगता होणारेय.



यंदाच्या महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य तयारी केलीय. या कुंभमेळ्यासाठी १० हजार एकर जागेवर व्यवस्था केलीय. ६ हजार ८०० बसेस, २०० वातानुकूलित बसेस आणि लाखो भाविकांसाठी शौचालय, निवासस्थानं आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत भाविकांच्या सुरक्षेसाठी खास ५५ पोलीस स्थानके उभारण्यात आली असून ४५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात केलेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्नानाच्या दिवशी २ कोटीहून अधिक भाविक येतील. तर २९ जानेवारीला पौष अमावस्येला १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर उभारलेय. या शहरात ५० लाख ते १ कोटी भाविक सामावले जाऊ शकतात, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.


यावेळच्या महाकुंभाचा (Mahakumbh) विशेष योगायोग असा की, १४४ वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती उद्भवलीय, ज्यामुळं हा कुंभमेळा अधिक शुभ मानला जातो. पवित्र स्नान तुम्हाला पापमुक्ती आणि आत्मिक उन्नतीचा अनुभव देतो. हा कुंभमेळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून, तो जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. चला, आपणही या पवित्र सोहळ्याचा भाग होऊ या!

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय