भक्तीच्या महाकुंभचा आजपासून भव्य शुभारंभ, पहिले शाही स्नान आज

प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभाला सुरूवात होत आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि आस्थेचे प्रतीक म्हणजे हा महाकुंभ दर १२ वर्षांनी आयोजित होतो. महाकुंभ भारताच्या पौराणिक पंरपरा आणि अध्यात्मक वारसेचा उत्सव आहे. दर १२ वर्षांनी प्रयागराजच्या संगमाच्या किनारी महाकुंभाचे आयोजन होते. येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचे मिलन होते. महाकुंभाचे आयोजन १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत राहील.


याचे आयोजन ४ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आले आहे. कुंभमध्ये कोट्यावधी भक्तगण तसेच लाखोंच्या संख्येने साधु-संतही पोहोचतात. यासाठी खास तयारी केली जाते. यावेळेस महाकुंभामध्ये ४० कोटीहून अधिक भक्तगण येण्याची शक्यता आहे. केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक भक्तगण येथे संगमामध्ये शाही स्नानासाठी येतील. कुंभमेळ्यामध्ये बाबांचे विविधांगी रंग पाहायला मिळतात.



पौष पोर्णिमेच्या एक दिवस आधी ५० लाख लोकांनी केले स्नान


असे म्हणतात की कुंभच्या मेळ्यात स्नान केल्याने अखंड पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या