मुंबई : इंग्रजी नववर्षातला पहिलाच सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी तीळगुळाचं वाटप करून आत्पेष्टांच तोंड गोड केलं जातं. काळे कपडे परिधान केले जातात. पतंग उडवले जातात. सुवासिनी हळदीकुंकूचा सोहळा साजरा करतात. या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जाते. महाराष्ट्रात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
Makarsankrant Special : संक्रांती विशेष तिळगुळ, वाणाचे साहित्य, कपड्यांनी सजल्या बाजारपेठा
भोगी हा सण अनेक राज्यांमध्ये विविध नावांनी ओळखला जातो. तसेच ती विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात भोगी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यादिवशी मिश्र भाज्यांची भाजी जिला भोगी म्हणतात ती केली जाते. त्यासोबत तीळ लावलेली बाजारीची भाकरी केली जाते. भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून केस धुतले जातात. या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्यात येतो. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
अनेक राज्यांमध्ये भोगी वेगवेगळ्या स्वरूपात साजरी करतात. अगदी भोगीची भाजी करण्याचीही पद्धत निराळी आहे.