Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Ladki Bahin Yojana : लाडक्‍या बहीण योजनेचे पैसे वाढणार ?

Ladki Bahin Yojana : लाडक्‍या बहीण योजनेचे पैसे वाढणार ?
रायगड : राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा ४२६ वा जयंती सोहोळा आज पाचाड येथे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी फलोत्पादन राज्याचे रोजगार हमी, आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले बोलत होते.

योजनेचे पैसे वाढवण्यावर विचार सुरू


महायुतीचे सरकार आणण्यात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा आहे. या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबरच या योजनेची रक्कम वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे रोजगार हमी, आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी येथे बोलताना दिली. या कार्यक्रमाला भरतशेठ गोगावले यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राऊळ , विजय सावंत, सुरेश महाडिक, बंधू तरडे , संजय कचरे, गटविकास अधिकारी डॉ. स्मीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते राजमातेच्या मूर्तीला मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला आणि पूजन करुन राष्ट्रमातेला वंदन करण्यात आले. यावेळेस नवयुग विद्यापिठ ट्रस्टच्या विद्याथ्यांचे ढोल ताशा पथकाचे वादन आणि लेझीम पथकाने खेळाचे प्रात्यक्षिक झाले.
Comments
Add Comment