Mahakumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात येणाऱ्या नागा साधुंचा काय आहे इतिहास ?

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ हा मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा १५ किलोमीटरच्या परिघात सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यात नागा साधू येतात त्यांना धर्मरक्षक म्हटले जाते.



नागा म्हणजे काय?


जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात. तसेच त्यांना दिगंबर असेही म्हणतात. सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात. ते कधीही कपडे घालत नाहीत. तसेच इतिहास डोकावला तर असे लक्षात येते की याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "नागा हा शब्द नागपासून आला आहे. नाग म्हणजे पर्वत. जे हलत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहता त्याला नाग म्हणतात.



हा आहे इतिहास


प्राचीन काळात अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले. त्यांचा पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचार केले. त्या आक्रमकांना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले. त्यांनी परकीयांविरोधात अनेक लढाया लढल्या आहेत. नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढला. त्यांना शूर पुरुष, धर्मरक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जाते.



शास्त्राबरोबर शस्त्राची काय आहे परंपरा ?


नागा साधुंनी धर्म आणि समाजासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. नागा साधू हे जगतगुरू आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्यांच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात तरबेज आहेत. प्राचीन काळी नागा साधू त्रिशूळ, भाला, तलवार, कुऱ्हाड आणि खुकरी वापरत असत. आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. गेल्या २,५०० वर्षांपासून दशनामी संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी ही परंपरा पाळत आहेत. ते आखाड्यांमध्ये शस्त्रांची पूजा करतात.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय