अमरावती : सध्या राज्यभरात विषबाधा होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातून धक्कायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमध्ये एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या तब्बल १००हून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. (Women Poisoned In Amravati)
Pune E-Bus : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! वर्षभरात एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २०० ई-बस
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमरावतीच्या जवळ असणाऱ्या नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिला नेहमीप्रमाणे कामात हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी कंपनीत उपलब्ध असणारे पाणी प्यायल्यानंतर काही महिलांना मळमळ जाणवू लागली. मात्र वातावरणातील फरकामुळे होत असावं या कारणामुळे अनेक महिलांनी याकडे दुर्लक्ष केले.
परंतु काहीवेळाने एकामागोमाग एक सर्व महिलांना असा त्रास जाणवू लागला. एकाच वेळी तब्बल १०० हून अधिक महिलांना हीच समस्या जाणवू लागल्याने कंपनीने गंभीर दखल घेत तातडीने सर्व पीडित महिलांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या सर्व महिलांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, सध्या अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांवर उपचार सुरु आहेत. मात्र हा त्रास नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे स्पष्ट कारण अद्यापही समोर आलेले नाही. (Women Poisoned In Amravati)