कन्नौज : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौज रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची (Kannauj building collapses) घटना घडली. यामध्ये चार जण जखमी झाले असून काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Kurla Hotel Fire : कुर्ला परिसरात हॉटेलला आग, मोठी वित्तहानी
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारच्या सुमारास कन्नौज रेल्वे स्थानकावर सुरु असणाऱ्या इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळला. यामध्ये अनेक कामगार अडकले असून तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. काल संध्याकाळपर्यंत अडकलेल्या किमान २४ कामगारांना वाचवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, ही घटना नेमकी काशी घडली ते अद्यापही समोर आले नाही. (Kannauj building collapses)