कुर्ला : कुर्ल्यात प्रसिद्ध हॉटेलला आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. कुर्ला पश्चिमेतील रंगून हॉटेलला शनिवारी (११ जानेवारी) रोजी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर बाजूला असलेले ६ गाळे देखील जळून खाक झाले आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.
हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे लोळ दूर दूरपर्यंत दिसत होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आगीमुळे संपूर्ण परिसरात धूर मोठ्या प्रमाणात झालाय.
मात्र ही आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. आग लागल्यामुळे जीविताहानी झालेली नाही पण हॉटेल व्यवस्थापनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.