
नवी मुंबई : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखीत असणारा कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) स्वप्नपुर्ती झाल्याचे समोर आले आहे. कार्तिक आर्यनने नुकतेच इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे कार्तिकला ही पदवी प्राप्त करण्यासाठी तब्बल १० वर्ष लागले आहेत. दरम्यान, कार्तिक आर्यनने कॉलेजच्या दीक्षांत समारंभाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याची घटना घडली आहे. पुण्यातील ...
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकनं अभिनयासाठी अभियांत्रिकीचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. मात्र त्यानंतर कार्तिकने अभिनय क्षेत्रातून वेळात वेळ काढून इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (DY Patil University convocation) दीक्षांत समारंभात कार्तिक आर्यनला अभियांत्रिकीची पदवी प्रदान करण्यात आली.
दरम्यान, कार्तिक आर्यनने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये कॉलेजच्या मुलांनी त्यांच्या हिरोचे भव्य स्वागत केले. पदवी घेण्यासाठी तो त्याच्या आईला सोबत घेऊन गेला. तसेच व्हिडीओमध्ये कार्तिक विद्यार्थ्यांबरोबर नाचताना आणि आपल्या कॉलेजच्या आठवणींमध्ये रमताना दिसला. कार्तिकच्या चेहऱ्यावर इंजिनिअर झाल्याचा आनंद स्पष्ट दिसून आला.
View this post on Instagram