पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याची घटना घडली आहे. पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या थकबाकीमुळे विद्यार्थ्यांना बाहेर काढून कॉलेजला टाळे लावल्याचा प्रकार (Pune College Sealed) घडला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आली ही बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडवाडी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या (Abhinav Education Society) इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजने थकबाकी न भरल्यामुळे कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदाने ३२ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार या महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. या घटनेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत
बँकेने वसतीगृहातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढत सर्व मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. या कारवाईमुळे डिप्लोमा आणि डिग्री शाखांमधील एकूण १६५० विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे.