रामदास आठवलेंचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. उर्वरित जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही रामदास आठवले यांनी केली आहे. दिल्लीत विधानसभेची निवडणूक भाजपाच्या नेतृत्वात रालोआ लढवले. ही निवडणूक भाजपाच्या नेतृत्वातील रालोआच जिंकेल; असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.



दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहे. या सर्व जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार दिल्लीत बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विधानसभेच्या ७० जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे.



याआधी दिल्ली विधानसभेच्या २०२० च्या निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान झाले आणि मतमोजणी ११ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ६२ आणि भारतीय जनता पार्टीने आठ जागा जिंकल्या. बहुमताच्या जोरावर आम आदमी पार्टीने सरकार स्थापन केले. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आधी अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली होती. पण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागल्यामुळे नंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. यानंतर आम आदमी पार्टीच्याच आतिशी मार्लेना सिंग या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. आतिशी यांनी २१ सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.



आठवले गटाचे १५ उमेदवार

  1. सुल्तानपूर माजरा विधानसभा मतदार संघ- लक्ष्मी

  2. कोंडली विधानसभा मतदार संघ- आशा कांबळे

  3. तिमरपूर विधानसभा मतदार संघ- दीपक चावला

  4. पालम विधानसभा मतदार संघ- विरेंदर तिवारी

  5. नवी दिल्ली विधानसभा मतदार संघ- शुभी सक्सेना (माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात)

  6. प्रतापगंज विधानसभा मतदार संघ- रणजीत

  7. लक्ष्मी नगर विधानसभा मतदार संघ- विजय पाल सिंह

  8. नरिला विधानसभा मतदार संघ- कन्हैया

  9. संगम विहार विधानसभा मतदार संघ- तजेंदर सिंह

  10. मालविय नगर विधानसभा मतदार संघ- राम नरेश निशाद

  11. तुघलकाबाद विधानसभा मतदार संघ- मंजूर अली

  12. सदर बाजार विधानसभा मतदार संघ- मनीषा

  13. बदारपूर विधानसभा मतदार संघ- हर्षित त्यागी

  14. चांदणी चौक विधानसभा मतदार संघ- सचिन गुप्ता

  15. मटिया महल विधानसभा मतदार संघ- मनोज कश्यप


दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ - निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणुकीचा कार्यक्रम

  1. अधिसूचना : शुक्रवार १० जानेवारी २०२५

  2. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : शुक्रवार १७ जानेवारी २०२५

  3. उमेदवारी अर्जांची छाननी : शनिवार १८ जानेवारी २०२५

  4. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : सोमवार २० जानेवारी २०२५

  5. मतदान : बुधवार ५ फेब्रुवारी २०२५

  6. मतमोजणी : शनिवार ८ फेब्रुवारी २०२५

  7. निवडणूक प्रक्रिया 'या' तारखेपर्यंत पूर्ण करणार : सोमवार १० फेब्रुवारी २०२५

Comments
Add Comment

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही

सी. पी. राधाकृष्णन झाले भारताचे १५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे

फिजिओथेरपिस्टना 'डॉक्टर' उपाधी लावण्यास मनाई, आरोग्य सेवा महासंचालनालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : आरोग्य सेवा महासंचालनालय यांनी फिजिओथेरपिस्टसाठी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. आरोग्य सेवा

छत्तीसगड : गरियाबंदमध्ये चकमक, १० नक्षलवादी ठार

नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि