आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण झाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (जे. पी. नड्डा) यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली पण रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश टाळण्यात आला. हा निर्णय झाला त्याचवेळी रविंद्र चव्हाण भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. रविंद्र चव्हाणांना संयमी भूमिका राजकीयदृष्ट्या लाभदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. आता ते पक्षाच्या संघटानात्मक कामांचे नेतृत्व करतील. लवकरच राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करणे, निवडणूक जिंकण्यासाठी धोरण आखणे आणि ते अमलात आणणे अशी कामं रविंद्र चव्हाणांना आता प्राधान्याने करावी लागतील. तर बावनकुळे पुढील काही दिवसांत पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.