आमदार आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण झाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (जे. पी. नड्डा) यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली पण रविंद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश टाळण्यात आला. हा निर्णय झाला त्याचवेळी रविंद्र चव्हाण भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता रविंद्र चव्हाण यांची पक्षाने कार्यकारी महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. रविंद्र चव्हाणांना संयमी भूमिका राजकीयदृष्ट्या लाभदायी ठरल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. आता ते पक्षाच्या संघटानात्मक कामांचे नेतृत्व करतील. लवकरच राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करणे, निवडणूक जिंकण्यासाठी धोरण आखणे आणि ते अमलात आणणे अशी कामं रविंद्र चव्हाणांना आता प्राधान्याने करावी लागतील. तर बावनकुळे पुढील काही दिवसांत पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अर्थात प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

थुंकणाऱ्या प्रवाशांवर मोठी कारवाई करा! मुंबई मेट्रोच्या नवीन रेलिंगवर पानाचे-गुटख्याचे डाग

मुंबई : नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ च्या बाजूच्या रेलिंगवर (कठड्यावर) पान आणि गुटख्याचे घाणेरडे

कोस्टल रोडमुळे १२४४ झाडे धोक्यात; वर्सोवा ते दहिसर रस्त्यासाठी मोठा निर्णय

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोड प्रकल्पाच्या महत्त्वाच्या उत्तर भागाच्या विस्ताराचे काम

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंचा ओवैसी-पठाणांना 'चॅलेंज' तर उद्धव ठाकरेंना 'नैतिकते'वरून चिमटा

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि नेते वारिस पठाण यांना थेट

Nitesh Rane : 'जागा आणि वेळ कळवा, किंवा मस्जिद निवडा': मंत्री नितेश राणेंचे वारिस पठाणांना जाहीर आव्हान

'आय लव्ह मोहम्मद' बॅनरवरून संताप; 'धमक्या देऊ नका, हैदराबादमार्गे पाकिस्तानात पाठवावे लागेल' मुंबई : भाजपचे नेते

Nitesh Rane : "हे काय पाकिस्तान आहे का? शरीया आणायचा आहे?" मंत्री नितेश राणेंचा ओवैसींवर पलटवार!

तिसरा डोळा उघडायला लावू नका! आय लव्ह मोहम्मद' बॅनरवरून राणे संतप्त मुंबई : मंत्री नितेश राणे यांनी एमआयएमचे

Mumbai News : BMCची कडक कारवाई! '४८ तासांत बेवारस वाहने उचला', अन्यथा...महापालिकेचा थेट इशारा!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर स्वच्छ आणि रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी एक मोठी आणि कडक मोहीम सुरू