मुंबई : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात जणांवर मकोका लागवण्यात आला. आणखी एकाचा शोध सुरू आहे. आरोपी सापडताच त्याच्या विरोधातही मकोका अंर्गत कारवाई होणार आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी वसुली प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. वाल्मिक कराड विरोधात कोणत्या कलमांतर्गत कारवाई होणार हे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. पोलीस कारवाई सुरू असली तरी या प्रकरणात राजकीय विरोधक सतत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या संदर्भात विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार संतापले.
सरपंचाच्या बाबतीत जो घडले त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी, सीआयडी ते न्यायालयीन चौकशी अशा तीन पातळीवर चौकशी सुरू केली आहे. कोणालाही विशेष संरक्षण मिळणार नाही. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होईल. अगदी मंत्री असला तरी कारवाई होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…. हे सांगूनही अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. प्रश्नांच्या या सरबत्तीमुळे अजित पवार संतापले.
तुझी चौकशी कधी होईल ?…तुझं नाव आलं तर होईल ना…जर तुझं नाव आलं नसेल तर बळ बळ तुझी चौकशी करतील का रे ?…काय तुम्ही पण… म्हणत अजित पवार संतापले आणि निघून गेले.
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…