Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर संतापले अजित पवार

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर संतापले अजित पवार
मुंबई : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात जणांवर मकोका लागवण्यात आला. आणखी एकाचा शोध सुरू आहे. आरोपी सापडताच त्याच्या विरोधातही मकोका अंर्गत कारवाई होणार आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी वसुली प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. वाल्मिक कराड विरोधात कोणत्या कलमांतर्गत कारवाई होणार हे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. पोलीस कारवाई सुरू असली तरी या प्रकरणात राजकीय विरोधक सतत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या संदर्भात विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार संतापले.



सरपंचाच्या बाबतीत जो घडले त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी, सीआयडी ते न्यायालयीन चौकशी अशा तीन पातळीवर चौकशी सुरू केली आहे. कोणालाही विशेष संरक्षण मिळणार नाही. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होईल. अगदी मंत्री असला तरी कारवाई होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.... हे सांगूनही अजित पवारांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. प्रश्नांच्या या सरबत्तीमुळे अजित पवार संतापले.

तुझी चौकशी कधी होईल ?...तुझं नाव आलं तर होईल ना...जर तुझं नाव आलं नसेल तर बळ बळ तुझी चौकशी करतील का रे ?...काय तुम्ही पण... म्हणत अजित पवार संतापले आणि निघून गेले.
Comments
Add Comment