
चंदीगड : प्रियसीने बोलणं बंद केलं म्हणून प्रियकर दुखावला गेला. या अबोल्याच्या धाग्यात प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. गर्लफ्रेंडने बोलणं बंद केल्यामुळे प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेत मित्राची हत्या केली. आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबई : फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अत्यंत महत्वाच्या १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ...
पंजाबमधील पठाणकोट येथे राहणारा बलजीत सिंग ४ जानेवारीला अचानक बेपत्ता झाला. बराच शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण, चौकशी करूनही बलजीतचा पत्ता लागला नाही. दरम्यान तपास करत असताना पोलिसांच्या खबऱ्याकडून रावी नदीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात या व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलिसांवी सांगितलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. अशातच पोलिसांचा बलजीतच्या मित्रावर संशय आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून बलजीतचा खून केल्याची कबुली दिली. आणखी दोघांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.