Sunday, May 11, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

Maharashtra Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विनोदासोबत रॅपरचा आवाज घुमणार! 'ही' रॅपर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

Maharashtra Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विनोदासोबत रॅपरचा आवाज घुमणार! 'ही' रॅपर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

मुंबई : मनोरंजनासाठी प्रेक्षकांना कॉमेडी शो पसंतीस येतात. त्यातही मराठी प्रेक्षक हास्यजत्रेसारख्या रिऍलिटी शोचे चाहते असतात. या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर या कार्यक्रमाने आणि त्यातील कलाकारांनी महाराष्ट्राचं नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही टीम नेहमीच काहीतरी वेगळं करू पाहत असते. हास्यजत्रेच्या मंचावर वेगवेगळे प्रयोग होत असतातच. अशातच आता मनोरंजन आणि रॅपचा ताळमेळ साधून हास्याचा कल्लोळ उडणार आहे. या नवीन सिझन मध्ये हास्यजत्रेची टीम प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येणार आहे.



'मैं नहीं तो कौन बे' म्हणणारी भारताची सुप्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे विनोदासोबत आपल्या रॅपच्या अनोख्या ढंगात दिसणार आहे. सृष्टी हास्यजत्रेच्या विनोदवीरांसोबत स्किट करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिक उत्सुक आहेत. आजवर तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलंय पण आता तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना हास्यजत्रेच्या मंचावरून पाहता येणारे.

Comments
Add Comment