Javed Akhtar : बॉलीवूडमधील लेखणीचे जादूगार जावेद अख्तर 'एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित!

मुंबई : गेल्या अने दिवसांपासून चर्चेत असणारा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला (Third Eye Asian Film Festival) प्रारंभ झाला आहे. एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्रशासनाचा सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हॉलिवूड आणि युरोपमधील लोकप्रिय चित्रपट यामध्ये दाखवले जाणार आहेत. दरम्यान, थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून बॉलीवूडमधील लेखणीचे जादूगार जावेद अख्तर (Javed Akhtar) 'एशियन कल्चर’ (Asian Culture) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



या पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी, चित्रपट जगतात लेखकांना त्यांचा योग्य तो मान व दाम मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. आपल्याकडे उत्तम कलागुणांची खाण असून त्याला योग्य तो वाव देत आपल्या मातीतल्या प्रादेशिक कलाकृतींसाठी आपण आग्रही राहायला हवे असे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. आपल्या चित्रपटांची परंपरा ही गीत-संगीताची आहे. असं असताना हल्लीच्या चित्रपटांमध्ये मला गीत- संगीताचा अभाव दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ही परंपरा आवर्जून जपली जाते . आपल्याकडे चित्रपटांमध्ये गीत- संगीताला जर महत्त्व दिले तर आपला चित्रपट हा जागतिक दृष्टया नक्कीच नावाजला जाईल असे मत लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्रफिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू - रावराणे, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये