Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Jumped Deposit Scam: सावधान ! पिन टाकताच अकाऊंटमधून उडतील पैसे

Jumped Deposit Scam: सावधान ! पिन टाकताच अकाऊंटमधून उडतील पैसे

चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही क्षणातच आपले बॅंक खाते रिकामे होते. तसेच सायबर गुन्हेगार सामान्य लोकांना लुटण्यासाठी नवनवीन मार्गही शोधत असतात. अशातच एक नवा स्कॅम सध्या सर्रास होताना दिसत आहे. या स्कॅमचे नाव जंप्ड डिपॉझिट स्कॅम (Jumped Deposit Scam) आहे. खरं तर हा एक नवा सायबर स्कॅम आहे जो युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्यांना टार्गेट करत आहेत. या स्कॅममध्ये स्कॅमर्स लोकांनी न मागताच त्यांच्या अकाऊंटमध्ये एक छोटी रक्कम टाकून त्यांना फसवतात.



कसा होतो हा स्कॅम?


या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार प्रथम यूपीआयच्या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यात थोडी रक्कम जमा करतात. त्यानंतर ते त्यांना मोठी रक्कम परत करण्याची विनंती करतात. खात्यात पैसे येत असल्याची माहिती मिळाल्यावर ते अनेकदा यूपीआय अ‍ॅप उघडून बॅलन्स तपासतात आणि पिन टाकतात. यावेळी या त्यांनी बनावट ट्रान्झॅक्शनची रिक्वेस्ट पाठवलेली असते. आपला पिन टाकताच ही रिक्वेस्ट मान्य केली जाते आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढले जातात. तसेच तामिळनाडू पोलिसांनी लोकांना या घोटाळ्याबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर अशा फसवणुकीच्या तक्रारी सातत्यानं नोंदवल्या जात आहेत.



हा घोटाळा कसा टाळायचा?


तुमच्या खात्यात काही अनोळखी व्यक्तीकडून पैसे आल्यास काही वेळ थांबा. बॅलन्स ताबडतोब तपासणं आवश्यक असल्यास मुद्दाम चुकीचा पिन टाका. असं केल्यानं कोणतीही रिक्वेस्ट नाकारली जाईल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील.



असे सावध राहा


यूपीआय वापरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणारे पैसे आणि त्यांच्या रिक्वेस्टबाबत सावधगिरी बाळगा. फसवणुकीचे व्यवहार टाळण्यासाठी नेहमी विचारपूर्वक काम करा. तसेच आपला पिन गोपनीय ठेवा. आणि असे काही घडल्यास सायबर क्राईम पोर्टलवर अशा घटनांच्या तक्रारी तात्काळ नोंदवा.(Jumped Deposit Scam)

Comments
Add Comment