Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांवर युझवेंद्र चहलची भावनिक पोस्ट

  136

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करण्याच्या चर्चाही सुरू आहेत. तसेच एकमेकांनी लग्नातले फोटो डिलिटही केले होते. त्यानंतर हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. या चर्चेनंतर आता चहलने आपल्या भावना व्यक्त करत सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपला घटस्फोट झाला आहे का नाही?  याबाबत काहीही थेटपणे लिहिलं नसलं, तरी त्याने यातून काही संकेत दिले आहेत.



युझवेंद्र चहलची काय आहे पोस्ट ?


युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी ठेवली आहे. या स्टोरीमध्ये त्याने त्याच्या घटस्फोटाच्या चर्चेवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, 'माझ्या सर्व चाहत्यांचा मी त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे, त्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. पण हा प्रवास संपण्यापासून दूर आहे. माझ्या देशासाठी, माझ्या संघासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी अजूनही अनेक अविश्वसनीय ओव्हर बाकी आहेत. मला एक खेळाडू असल्याचा अभिमान आहे, मी एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र देखील आहे. माझ्या अलीकडच्या घडामोडींबद्दल, विशेषतः माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दलची उत्सुकता समजते. पण, मी काही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या आहेत ज्या सत्य असू शकतात किंवा नसू शकतात. पुढे चहल म्हणाला की, एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र या नात्याने, मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप वेदना दिल्या आहेत. माझ्या कौटुंबिक मूल्यांनी मला नेहमीच सर्वांसाठी शुभेच्छा देण्यास शिकवले आहे, शॉर्टकट न स्वीकारता समर्पण आणि कठोर परिश्रम करून यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि मी या मूल्यांशी वचनबद्ध आहे. दैवी आशीर्वादाने, सहानुभूती नव्हे तर तुमचे प्रेम आणि पाठिंबा मिळविण्याचा मी सदैव प्रयत्न करेन', असं युझवेंद्र चहल त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.



दोघांच्या नात्याचे भविष्यात पुढे काय ?


दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेनंतर धनश्री वर्मानेदेखील आपल्या इन्स्टाग्राम खात्याच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती. चहलने २०१६ साली झिम्बाब्वे दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. धनश्री वर्माही एक कोरिओग्राफर आहे. तिचे इंस्टाग्रामवर ६२ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. बराच काळ दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २२ डिसेंबर २०२० मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर 'झलक दिखला जा' या रिऍलिटी शोमध्येही या दोघांची जोडी सहभागी झाली होती. घटस्फोटाच्या या चर्चेदरम्यान धनश्री वर्मा लोकप्रिय कोरिओग्राफर प्रतीक उतेकरला डेट करत आहे असं म्हंटलं जात आहे. धनश्री आणि प्रतीकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा सुरू झाल्या. यांच्या नात्याचे भविष्यात काय होणार? असे या दोघांचेही फॅन्स विचारत आहेत.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक