Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Santosh Deshmukh : मुलीच्या आक्रोशाने उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले

Santosh Deshmukh : मुलीच्या आक्रोशाने उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात आज भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते. दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने केलेल्या भाषणादरम्यान उपस्थित तर भावूक झालेच पण लेकीचे वडिलावरचे प्रेमही पाहायला मिळालं. ती म्हणाली, पप्पा तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा अशा आर्त हाक यावेळी तिने दिली.



वैभवीचे अश्रू अनावर...


आमच्या पाठीमागे कायम राहा माझ्या वडिलांची छळ करून का हत्या केली," असं सांगताना वैभवी देशमुखला अश्रू अनावर झाले. यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.



माझ्या भावाचं काय चुकल ?


संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही यावेळी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, "जगात सगळं दिसत पण माझा भाऊ मला दिसत नाही. माझ्या भावाचं काय चुकलं, २० वर्ष सेवा केली हे चुकलं का.? या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सीआयडीच्या हाती एक व्हाईस सँपल लागले आहे, ते मॅच झाले आहे. आमच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ द्या. आपल्या भावाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. गुन्हेगारी मुळासकट उखडून टाकण्याची ही मुख्यमंत्र्यांना संधी आहे".



उद्या धाराशीवमध्ये मोर्चा


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता मोर्चाला होणार सुरुवात होणार आहे. या मोर्चात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मनोज जरांगे आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. तसेच सर्व मराठा संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.

Comments
Add Comment