Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वटाटा टियागो, टाटा टियागो ईव्ही आणि टिगोर लाँच

टाटा टियागो, टाटा टियागो ईव्ही आणि टिगोर लाँच

मुंबई : भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या तीन नवीन कार बाजारात लाँच केल्या आहेत. कंपनीने टियागो.ईव्ही आणि टिगोरसह एंट्री लेव्हल कार टाटा टियागोला अपडेट केले आहे. कंपनीने २०२५ या मॉडेलमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन डिझाइन आणि नवीन रंग पर्याय दिले आहेत. आपल्या मजबूत मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा एक भाग म्हणून टाटा मोटर्स २०२५ टियागो पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आणि २०२५ टिगोर पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये देत आहे. या दोन्ही कारमध्ये एमटी आणि एएमटी पर्याय उपलब्ध आहे.

अक्षय कुमारच्या उपस्थितीत पोकोच्या एक्स७ सीरिजचे दोन मोबाईल लाँच

कंपनीने टियागो, टियागो.ईव्ही आणि टिगोरसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे. २०२५ टियागोची सुरुवातीची किंमत ४.९९ लाख रुपये, टियागो.ईव्हीची किंमत ७.९९ लाख रुपये आणि टिगोरची किंमत ५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून आहे. या कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे बुक केल्या जाऊ शकतात.

Swiggy SNACC : स्विगीची घोषणा, १५ मिनिटांत गरमागरम जेवण घरपोच देणार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -