मुंबई : भूक लागली आहे, मग स्वयंपाकघरात जाण्याची आवश्यकता नाही… स्विगीवर ऑर्डर द्या १५ मिनिटांत गरमागरम जेवण घरपोच मिळेल; अशी घोषणा करत स्विगी कंपनीने स्नॅक (SNACC) नावाचे नवे मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपवरून ऑर्डर दिल्यास १० ते १५ मिनिटांत पदार्थ घरपोच मिळतील, असे आश्वासन स्विगीने दिले आहे. अॅप बेस्ड फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस कंपन्यांमध्ये सध्या स्विगीला झोमॅटो, झेप्टो या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. स्पर्धकांना मागे टाकत मोठी आघाडी घेण्यासाठी स्विगीने स्नॅक (SNACC) नावाचे नवे मोबाईल अॅप लाँच केले आहे.
CM Devendra Fadnavis : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होतेय ड्रग्जची देवाणघेवाण!
झोमॅटोने १० मिनिटांत पदार्थ घरपोच पोहचवू अशी जाहिरात सुरू केली. यानंतर स्विगीने स्नॅक (SNACC) हे अॅप लाँच करून नव्याने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाचे यशापयश स्विगीला ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून आहे. स्विगीच्या ‘स्नॅक’ला झोमॅटोच्या ‘क्विक फूड डिलिव्हरी’ आणि झेप्टोच्या ‘कॅफे’ या सेवांच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. झटपट फूड डिलिव्हरी देण्यासाठी भारतात बड्या कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. याचा फायदा ग्राहकांना होईल, असे मत या विषयातले तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.