मुंबई : मुंबईतील वांद्रे (Mumbai Crime) भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. स्क्रिझोफेनिया आजाराच्या पीडित महिलेने रागाच्या भरात पोटच्या मुलाचा वायरीने गळा आवळून जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी महिला अभिलाषा औटी (३६) हिने तिच्या १० वर्षीय मुलगा सर्वेश याला ठार मारले. आरोपी महिला स्क्रिझोफेनिया आजाराची पीडित असून त्यांची मानसिक स्थिती स्थिर नव्हती. काल काही कारणामुळे अभिलाषा यांना राग आला असून रागाच्या भरात त्यांनी सर्वेशला खेचत बेडरुममध्ये नेले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा बंद करुन वायरने त्याचा गळा आवळला. दरम्यान, या घटनेत सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी सर्वेशचे वडिलांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अभिलाषा औटी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. (Mumbai Crime)
काय आहे स्क्रिझोफेनिया आजार?
स्क्रिझोफेनिया (Schizophrenia) हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजाराच्या रुग्णांना वेगवेगळे भास होणे, बुद्धीभ्रंश आणि मनात विसंगत विचार येणे, असा त्रास जाणवतो. त्यामुळे या व्यक्तींचे वागणे सामान्य नसते.