भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान

  85

जगातील युद्धांवर पॉडकास्टमध्ये मांडली भूमिका


नवी दिल्ली : जगात सुरू असलेल्या युद्धांच्या संदर्भात भारताची भूमिका तटस्थ नाही. तर भारत शांततेच्या बाजुने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधानांनी हे मनोगत व्यक्त केले.


रशिया आणि युक्रेनममध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युध्द सुरू आहे. यात लाखो लोक मारल्या गेले आहेत. पश्चिम आशियातील इस्रायल-हमास-इराण संघर्षामुळेही अभूतपूर्व मानवीय संकट निर्माण झाले आहे. भारत या आव्हानाकडे कसे पाहतो..? देश जगाच्या मित्राच्या भूमिकेत आहे की तटस्थ आहे, या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत शांततेच्या बाजूने आहे.



जागतिक शक्तींमधील प्राणघातक, हिंसक संघर्षादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, आज जगात भारताबद्दल विश्वास आहे. आमचे वागणे दुटप्पी नसून आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे वागत नाही. या संकटकाळात आम्ही सातत्याने सांगितले आहे की, आम्ही तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहोत. माझा दृष्टिकोन शांतीचा आहे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील त्यांना मी पाठिंबा देईन असे मोदींनी सांगितले. रशिया-युक्रेन, इस्रायल, इराण आणि पॅलेस्टाईनलाही माझे हेच सांगणे असते की, शांततेतून प्रश्न सुटतो त्यामुळे शांतील पर्याय नाही. विशेष म्हणजे भारतीयांना जसा माझ्यावर विश्वास आहे की, हे देशाचे संकट योग्य पद्धतीने हाताळतील तसाच विश्वास या देशांना देखील आहे की, भारत जे बोलतो तीच त्यांची खरी आणि योग्य भूमिका आहे असे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस