अमरावती : अमरावती शहरातील प्रसिद्ध बालाजी मंदिरात आज वैकुंठ एकादशीनिमित्त (Vaikuntha Ekadashi) बालाजी मंदिराचे वैकुंठद्वार उघडण्यात आले. या द्वारातून भगवान बालाजींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. वर्षातून एकदाच हे द्वार उघडले जाते. त्यामुळे सकाळी ६ वाजेपासून भाविकांनी बालाजींचे दर्शन घेतले. वैकुंठ एकादशीनिमित्त पालखी काढण्यात आली. मंदिरावर सुरेख विद्युत रोषणाई करण्यात आली. भाविकांना प्रसादाचे वितरण हि करण्यात आले.
आज सकाळी भगवान बालाजीं चे विधिवत पूजा अर्चना केल्यानंतर पालखी काढण्यात आली त्यानंतर मंदिराचे वैकुंठद्वार उघडण्यात आले. यावेळी जय गोविंदा, व्यंकटरमना गोविंदा च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
Black Dog Film : ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपटाचा पडदा