Sunday, May 18, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

R Ashwin : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही! अश्विनच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात खळबळ

R Ashwin : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही! अश्विनच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात खळबळ

चैन्नई : भारताचा फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) काही दिवसांपूर्वीच बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आर अश्विन चर्चेच्या स्वरुपात होता. अशातच आर अश्विनने चैन्नईत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.



अश्विनने नुकतीच चेन्नईतील इंजिनियरिंग कॉलेजला भेट दिली. त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांनसोबत भाषण करताना 'कोणाला हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यात रस आहे का, असे विचारले. मात्र, कोणीही रस दाखवला नाही. त्यावेळी अश्विनने म्हटले की 'मला वाटलं की मला हे म्हणायला हवं. ''हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही, ही अधिकृत भाषा आहे'', असे म्हटल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.




Comments
Add Comment