Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीHealth: थंडीत गुळासोबत मिसळून खा ही गोष्ट...नाही होणार सर्दी-खोकला

Health: थंडीत गुळासोबत मिसळून खा ही गोष्ट…नाही होणार सर्दी-खोकला

मुंबई: थंडीच्या दिवसांत आरोग्यकर चांगले राखण्याचे मोठे आव्हान असते. या मोसमात सर्दी-खोकल्याच्या समस्या अधिक सतावता. यामुळे या दिवसांमध्ये खाण्या-पिण्यामध्ये बदल करणे गरजेचे असते. घरातील किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आजारांपासून रोखण्याचे काम करतात. तसेच आरोग्यही चांगले राखते. अशीच एक जबरदस्त गोष्ट आहे लवंग.

याच्या सेवनाने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. यात थोडेसे गूळ मिसळल्यास याची ताकद अधिक वाढते. आरोग्य तज्ञांच्या मते, लवंग आणि गूळ खाल्ल्याने स्वाद चांगला मिळतो. तसेच आरोग्यही चांगले राहते. हे खाल्ल्याने थंडीच्या दिवसांत होणाऱे आजार दूर होतात.

गुळामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

यात फायबर आणि मिनरल्स असतात जे पाचनतंत्र मजबूत करण्यास मदत करतात तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतात.

कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज असल्याने गूळ शरीरासाठी एनर्जी बूस्टर आहे.

गुळामध्ये व्हिटामिन बी आणि मिनरल्स जे आर्यन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे शरीरासाठी गरजेचे असते.

गुळातील अँटीऑक्सिडंट गुण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात तसेच त्यामुळे केस चमकदारही बनतात.

गुळामध्ये ट्रिप्टोफॅन असते जे मेंटल हेल्थ चांगले राखण्याचे काम राखतात.

लवंग खाण्याचे फायदे

लवंगामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे सर्दी-खोकला दूर करतात.

लवंगामध्ये फायबर आणि मिनरल्स असतात ज्यामुळे पाचनतंत्र मजबूत होण्यास मदत होते.

तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

थंडीत गूळ आणि लवंग एकत्र मिसळून खाण्याचे फायदे म्हणजे इम्युन सिस्टीम मजबूत होते. तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -